दिवाळी सणाची लगबग सुरू; बाजारपेठा खरेदीसाठी सज्ज

सातारा, दि. 26 – दिवाळी म्हणले की दारात आकाश कंदील. दिवाळी म्हणजे खुप सारे फटाके. दिवाळी म्हणजे किल्ला. दिवाळी म्हणजे नवीन कपडे. दिवाळी म्हणजे फराळ. याच दिवाळी सणा निमित्त बाजारपेठांमध्ये आकाश कंदील, रांगोळ्या , पणत्या, किल्यावरील साहित्य खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. या सर्व वस्तूंनी सातारच्या बाजारपेठा सजल्या आहेत. चाकरमान्याचे पगार देखील झाल्याने बॅंकांच्या बाहेर एटीएम मधून पैसे काढताना भल्या मोठया रांगा लागल्या आहेत. दिवाळीसाठी एकीकडे फराळ बनविण्यास जिन्नस आणून फराळाचे खाद्यपदार्थ बनवण्याठी महिला वर्गाने कंबर कसली आहे तर दुसर्याबाजूला बाजारामध्ये रेडीमेड लाडू, चकली, अनरसे, चिवडा, कडबोळी बाजारात माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
दिवाळी सणा निमित्त वर्षभरात सर्वाधिक खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. त्यामुळे बाजारपेठेत विशेष करून विविध दुकांनामध्ये आकर्षक योजनांची लयलुट ग्राहकांसाठी असते. सातारामधील सोन्याचांदीची दुकाने, कपडे, फटाक्‍याचे स्टॉल , मांडणी तसेच खेळणी, भेटवस्तू, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू ,घरगुती वापराची उपकरणे, चपला-बुट याची खरेदी करताना ग्राहकांनी दुकाने हळूहळू भरत असल्याचे पहायला मिळत आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे इको फ्रेंडली पध्दतीच्या आकाश कंदीलांना मागणी आहे. विविध पध्दतीच्या आकर्षक पध्दतीच्या पणत्यांनी राजवाडा चौपाटी परिसर तसेच गोल बागेला वेढा टाकूण सज्ज झाले आहेत.
शाळांना सुट्या लागल्या आहेत तर काही अद्याप सुरू आहेत. मात्र बालचमुंनी विविध प्रकारच्या किल्ले बनविण्याची नियोजने सुरु केले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये विविध मंडळे किल्ला स्पर्धांचे आयोजन देखील करत असतात. किल्यावरील मावळे, शिवाजी महाराज व इतर सैन्य तसेच खेळणी खरेदीसाठी आता या आठवडा भरात धांदल लवकरच सुरू होईल.
विशेष म्हणजे दिवाळी सणानिमीत्त प्रशासकिय पातळीवरती देखील वाहतुकीचे नियोजन तसेच फटाका स्टॉल परवाने, गर्दी मधील चोरीचे प्रकार व अचानक घडणाऱ्या घटनांसाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचे पहायला मिळत आहे.
राज्य सरकारी कर्मचा-यांना दिवाळीच्या आधीच सरकारनं एक गोड बातमी दिली आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्‍क्‍यांची वाढ करण्याची आली आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर 2018 च्या पगारात कर्मचा-यांना हा वाढीव भत्ता मिळू शकतो. या महागाई भत्याचा फायदा कर्मचा-यांना पोहोचणार असून, कर्मचा-यांची दिवाळी धूमधडाक्‍यात साजरी होणार यांत शंकाच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)