दिवाळी संपताच फळभाज्यांना “अच्छे दिन’

सुट्टी संपल्याने मागणी वाढली : काही भाज्यांचे भाव वाढले

पुणे – दिवाळी सुट्टीनंतर मेस, खानावळ, कंपनीच्या कॅंटीन सुरू सोमवारपासून सुरू होत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांना मागणी वाढली आहे. आवक कमी झाल्यामुळे त्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे घेवडा, मटार, आले, हिरवी मिरची, शेवगा, काकडी, कोबी, सिमला मिरची आणि गाजरच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर आवक वाढल्यामुळे बटाटा, भेंडी, टोमॅटो आणि पावटाच्या भावात घट झाली आहे. उर्वरित भाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

-Ads-

रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात सुमारे 140 ते 150 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून आलेल्या भावामध्ये आंध्रप्रदेश आणि गुजरात येथून दोन ट्रक कोबी, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथून 12 ते 13 टेम्पो हिरवी मिरची, बेंगलोर येथून 1 टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 4 ट्रक गाजर, हिमाचल प्रदेश येथून 2 ट्रक मटार, कर्नाटक येथून 2 टेम्पो घेवडा, कर्नाटक येथून 2 टेम्पो पावटा, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले 400 ते 500 पोती, टॉमेटो साडेपाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 8 ते 10 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, भुईमूग 40 ते 50 पोती, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, गाजर 150 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, कांद्याची 80 ते 10 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 45 ट्रक इतकी आवक झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)