दिवाळी महोत्सवाने मिळाला कलाकारांच्या कलागुणांना उजाळा

वाई ः दिवाळी महोत्सव 2018 कार्यक्रमात कला सादर करताना कलाकार.

वाई, दि. 12 (प्रतिनिधी) – देशभरातील तरूण मंडळी फटाक्‍याच्या आतीषबाजीत व्यस्त असताना वाईमधील यंगस्टर्स या विविध समाजउपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या तरूण मुला-मुलींच्या ग्रुपने सामाजिक जाणीव जपत दिवाळी महोत्सव 2018 साजरा केला.
वाईमध्ये अनेक विविध क्षेत्रात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असलेल्या वाई यंगर्स्टचा सांस्कृतिक वारसा जपणारा उपक्रम दिवाळी महोत्सवाला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये वाईसह तालुक्‍यातून अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिभावंत अभिनयाने राज्यपातळीवर आपला वेगळा ठसा उमठवला आहे. यासाठी वाईतील कलाकारांना आपल्या अंगी असलेल्या कलेला वाव व व्यासपीठ देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वाईमधील कलाकरांना त्यांची कला संगीत, गायन, वादन, नृत्य, काव्य सादर करण्यासाठी वाई यंगस्टर्सने निशुल्क उपलब्ध करून दिलेले आपल्या हक्‍काचे व्यासपीठ दिल्याने अनेक नवोधित कलाकारांनी समाधान व्यक्‍त केले.
दिवाळी महोत्सव 2018 वाईमधील तरूण व नवीन कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी त्यांच्या आत्मविष्वास वाढावा आणि त्याचबरोबर वाईतील तरूणाईचा देखील सर्वांगीण विकास व्हावा याच उद्देशाने दिवाळी महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले होते असे वाई यंगस्टर्स ग्रुपचे अध्यक्ष ओंकार सपकाळ यांनी सांगितले. कार्यक्रमात वाईतील अनेक तरूण कलाकरांनी आपली कला सादर करून वाईकरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी एस. आर. ग्रुपने डान्स सादर केला. कार्यक्रमामध्ये खास आकर्षण ठरलेल्या गायिक प्रियांका भिलारे व संकेत यांनी आपल्या गाण्यांनी नागरिकांना भुरळ घातली. अलंकार सपकाळ व अनिकेत मोरे यांना कॉमेडी नाटक सादर करून पोट धरून हसविले. देशपांडे, आनंद पटवर्धन, राकेश लगस यांनी कविता सादर केली. तन्वी पवार हिने अंगावर शहारे आणणारी शिवाजी महाराजांवर नाटिका सादर केली. सूत्रसंचालन अनिकेत मोरे आणि सोनवणे यांनी केले. तर आभार श्रीरंग शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वाई यंगस्टर्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)