दिवाळी बंपर डिस्काऊंट – इतिहास पडझडीचा आणि उसळीचाही! (भाग-२)

आपण सध्या वर्तमानपत्रातून तसेच टीव्ही, रेडिओवर दसरा-दिवाळी धमाका ऑफर ऐकत आहोत. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर, घरांवर, वाहनांवर दिवाळीनिमित्त मोठामोठाल्या धमाका ऑफर्स सादर केल्या जात आहेत. तशीच धमाकेदार ऑफर शेअर बाजारानेही यंदाच्या दिवाळीला गुंतवणूकदारांसाठी आणली आहे.

दिवाळी बंपर डिस्काऊंट – इतिहास पडझडीचा आणि उसळीचाही! (भाग-१)

आजपर्यंतच्या शेअर बाजाराच्या प्रवासात यापेक्षाही मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजार उसळी मारून वर आलेला आहे. अशा संक्रमणाच्या काळात गुंतवणूकदारांनी संयम ठेवायला हवा. आपल्या आर्थिक सल्लागाराशी विचारविनिमय करून सद्य परिस्थितीचा सविस्तर आढावा घ्यायला हवा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनाक्रम

१९९२ – हर्षद मेहता शेअर गैरव्यवहार – एका वर्षात निर्देशांकाची ५४ टक्के घसरण झाली. त्यानंतर दीड वर्षात बाजारात १२७ टक्क्यांचा परतावा मिळाला.

१९९६ – आशियातील वित्त संकट – चार वर्षात निर्देशांकात ४० टक्क्यांची घसरण, पुढील वर्षात ११५ टक्क्यांची वाढ निर्देशांकात झाली.

२००० – माहिती तंत्रज्ञानाधारीत गैरव्यवहार – निर्देशांकात दीड वर्षात ५६ टक्क्यांची पडझड, पुढील अडीच वर्षात निर्देशांकात १३८ टक्क्यांची वाढ

२००८ – अमेरिकेती लेहमन ब्रदर्स संकट – एका वर्षात निर्देशांकात ६१ टक्क्यांची घसरण, पुढील दीड वर्षात १५७ टक्क्यांनी निर्देशांकात वाढ

२०१० – जागतिक वित्तिय संकट – एका वर्षात निर्देशांकात २८ टक्क्यांची घट. पुढील तीन वर्षात ९६ टक्क्यांची भरघोस वाढ.

२०१५ – चीनचे चलन युआनवरील आर्थिक संकट – एका वर्षात निर्देशांकात २३ टक्क्यांनी घट, पुढील तीन वर्षात ४० ट्क्यांनी वाढ.

हा इतिहास लक्षात घेता गेली अनेक दशके शेअर बाजारात विविध कारणांनी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर पुढील काळात भरघोस परतावा गुंतवणूकदारांना मिळालेला आहे. म्युच्युअल फंडातील एसआयपी, एसटीपी या माध्यमातून सतत गुंतवणूक करत राहणे हे अत्यंत फायद्याचे ठरते. अशा काळात उत्तम परतावा देणाऱ्या डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडांच्या योजना एकरकमी गुंतवणुकीसाठीही उत्तम पर्याय ठरू शकतात. कोणतीही गुंतवणूक नेमकी गुंतवणुकीची गरज समजूनच योग्य अशा पर्यायामध्ये करणे आवश्यक आहे. दीर्घकालिन उद्दीष्टांसाठी सध्याच्या काळात केली जाणारी गुंतवणूक भरघोस परतावा दिल्याशिवाय राहणार नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)