दिवाळी बंपर डिस्काऊंट – इतिहास पडझडीचा आणि उसळीचाही! (भाग-१)

आपण सध्या वर्तमानपत्रातून तसेच टीव्ही, रेडिओवर दसरा-दिवाळी धमाका ऑफर ऐकत आहोत. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर, घरांवर, वाहनांवर दिवाळीनिमित्त मोठामोठाल्या धमाका ऑफर्स सादर केल्या जात आहेत. तशीच धमाकेदार ऑफर शेअर बाजारानेही यंदाच्या दिवाळीला गुंतवणूकदारांसाठी आणली आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये  ३८,८९६ वर असणारा निर्देशांक आज ऑक्टोबर संपता-संपता ३४ हजारांपर्यंत खाली आला आहे. जवळपास बारा टक्क्यांचा डिस्काऊंट सेल गुंतवणूकदारांना मिळत आहे. अनेक लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्या ५० ते ८० टक्के डिस्काऊंटवर उपलब्ध आहेत. आजपर्यंतचा मागील २६ वर्षांचा इतिहास पाहिला असता १९९२ पासून आजपर्यंत सहा वेळा मोठी पडझड शेअर बाजाराने अनुभवली. परंतु त्यानंतरच्या काळात गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा परतावा मिळाला आहे. सप्टेंबर २०१८ पासून शेअर बाजारात मोठे चढउतार होत आहेत. यामागे अनेक देशार्तगत व आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. सामान्य गुंतवणूकदाराच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. आपल्याकडे असणारे शेअर्समधील गुंतवणूक सुरु ठेवावी की ते शेअर विकावेत? म्युच्युअल फंडात सुरु असणारी एसआयपी सुरु ठेवावी की बंद करावी, असा संभ्रम गुतंवणूकदाराच्या मनात आहे. परंतु १९९२ पासूनचा कालावधी लक्षात घेतला असता आतापर्यंत यंदापेक्षा मोठी घसरण व अस्थैर्यातून शेअर बाजार सावरला आहे. त्यापुढील काळात मोठी झेपदेखील घेतली आहे. त्यातून गुंतवणूकदारांना भरीव परतावा देखील मिळालेला आहे. गुंतवणूकदारांनी सध्याच्या स्थितीत शेअर व म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून बाहेर पडू नये. किंबहुना पैशाची उपलब्धता असेल तर उत्तम ब्लूचिप कंपन्यांचे शेअर्स व डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडांच्या योजनांमधील गुंतवणूक वाढवत न्यावी.

दिवाळी बंपर डिस्काऊंट – इतिहास पडझडीचा आणि उसळीचाही! (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध, देशात होणाऱ्या विधानसभा आणि आगामी लोकसभेची निवडणूक यामुळे शेअर बाजारात अनिश्चितता निर्माण झालेली आहे. यामुळे जवळपास १२ टक्के खालील भावात शेअर उपलब्ध आहेत. अशा स्थितीत फार काळ शेअर बाजार थांबत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)