दिवाळी पीठ गिरणी महोत्सवाचे आयोजन 

हाऊस ऑफ फ्लोअर मिल्सचा गृहिणींसाठी स्तुत्य उपक्रम 

पुणे – घरगुती पीठ गिरणी विक्रीत अग्रेसर असलेल्या हाऊस ऑफ फ्लोअर मिल्स तर्फे दिवाळी पीठ गिरणी महोत्सव सुरू करण्यात आला असल्याचे माहीती या दालनाचे संचालक संजीव गोळे यांनी दिली. ते म्हणाले की, सर्व नामांकीत कंपन्याच्या पीठ गिरणी एकाच छताखाली उपलब्ध असलेले हाऊस ऑफ फ्लोअर मिल्स हे एकमेव दालन आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घरपोच डिलीव्हरी आणि विक्री पश्‍चात सेवा ही या दालनाची वैशिष्ट्ये आहेत. या महोत्सवावेळी 1 ते 3 हजारांपर्यंतची आकर्षक सूट दिली जाणार आहे. गृहिणींचा वेळ, श्रम आणि पैसा याची बचत करून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी घरगुती पीठ गिरणी हा उत्तम पर्याय आहे. ही संधी गृहीणींना उपलब्ध करून देण्यात आम्हाला आनंद होत असल्याचे गोळे म्हणाले.

त्यांनी सांगितले की, डाळी, साखर, साबुदाणा, राजगिरा, गहू, इडली रवा, चकली, उपवासाची भाजणी, लाडूचा रवा, सांडग्याचा रवा, नाचणी, ज्वारी, बाजरी, आवळा आणि इतर जडी-बुटीची पावडर, मिरची, हळद, शेंगदाणा, खोबरे, खारीक, याचे भेसळविरहीत जाड- बारीक पीठ या गिरणीतून उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या महोत्वात गृहिणींकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. या महोत्सवाचा इतर महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यानी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)