दिवाळीसाठी जवानांना महापालिकेचा फराळ

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आहोरात्र पहारा देणाऱ्या लष्करी जवानांसाठी खास दिवाळीच्या फराळाची अनोखी भेट महापालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांनी पाठविली आहे.

नगरसचिव विभागाने जपली सामाजिक बांधिलकी

पुणे : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आहोरात्र पहारा देणाऱ्या लष्करी जवानांसाठी खास दिवाळीच्या फराळाची अनोखी भेट महापालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांनी पाठविली आहे.

मराठा बटालियनच्या युनिट-18 साठी भोर गावचे मराठा बटालियनमधील जवान तुषार शेटे यांच्या माध्यमातून बुधवारी हा फराळ पाठविण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसचिव सुनील पारखी, उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे, नगरसेवक सचिन दोडके यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीमेवर लष्करी जवानांना अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी खडा पहारा द्यावा लागतो. त्यामुळे त्यांना सणासुदीत घरी जाता येत नाहीत. आहे त्या ठिकाणी आणि आहे त्या परिस्थितीतच ते सण साजरे करतात. या जवानांना दिवाळीचा फराळ सीमेवर मिळावा, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम घेण्यात आला आहे. त्यात महापालिकेच्या नगरविकास विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वेच्छेने या फराळासाठी मदत केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)