दिवाळीसाठी इरफान खान भारतात परतणार 

इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मेंदूतील ट्युमरवरच्या उपचारांसाठी गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये असलेला इरफान खान दिवाळीसाठी भारतात परतणार आहे. “न्यूरो एंडोक्राईन ग्लॅन्ड’च्या उपचारांसाठी तो इंग्लंडला गेला होता, तेंव्हापासून त्याच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. आता तो भारतात येत असल्याने त्याच्या प्रकृतीबाबतच्या सर्व चर्चा थांबतील.

इरफानने स्वतःच हेल्थ अपटेडही सोशल मिडीयावर दिला आहे. सध्या इरफानवर केमोथेरपी सुरू आहे. त्या उपचारांचे परिणामही सकारात्मक दिसत आहेत. आता त्याच्या प्रकृऍतीत एवढी सुधारणा झाली आहे की तो भारतात परत येऊ शकेल. परत यायचे असेल तर ही दिवाळी भारतातच साजरी करण्याचे त्याने ठरवले आहे. इरफानच्या “हिंदी मिडीयम 2′ चे शुटिंगही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे तो थेट डिसेंबर महिन्यातच भारतात परत येईल, असा एक अंदाज वर्तवला जात होता. आपल्या प्रकृतीबाबतचा अपडेट कळवताना इरफानने इमोशनल मेसेज पोस्ट केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“माझ्या निकटवर्तीयांचे प्रेम आणि विश्‍वास दाखवल्यामुळे माझा आत्मविश्‍वास खूप वाढला आहे. दुर्लभ कथांचा शोध घेता घेता मलाही एखादा दुर्धर आजाराचा सामना करावा लागेल, असा मला कधीच अंदाज नव्हता.’ असे त्याने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)