दिवाळीसाठीच्या विचित्र पेहरावामुळे दिशा झाली ट्रोल

दिवाळीनिमित्त सर्व स्टारनी आपापल्या फॅन्सला इन्स्टाग्राम, ट्‌विटर आणि अन्य सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. दिशा पटणीनेही आपल्या फॅन्सला शुभेच्छा दिल्या आहेत. पण तिने केलेल्या पेहरावामुळे तिच्या चाहत्यांनी या शुभेच्छांच्या बदल्यात तिला प्रचंड ट्रोल केले. इतकेच नव्हे तर त्यांच्या टिप्पणीमुळे दिशाला आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या कॉमेंट ब्लॉक करण्याची वेळ आली.

दिशाने इन्स्टाग्रामवर आपले एक फोटो शूट पोस्ट केले होते. हातात पणती घेतलेल्या दिशाने चक्‍क स्पोर्टस ब्रा घातली होती. त्याबरोबर कलरफुल लहेंगा आणि दुपट्टा घेतला होता. तिचा हा पोषाख फॅन्सला अजिबात आवडला नाही. काहींनी तिच्या शुभेच्छांबदल्यात शुभेच्छा दिल्या, मात्र तिला सणाला शोभतील असे कपडे घालण्याचा सल्लाही दिला. ही वेशभूषा दिवाळीसारख्या मंगलप्रसंगी अगदीच अमंगल वाटत असल्याचेही काही जणांनी सुनावले. हा भारतीय पारंपरिक पोषाख नाही. दिवाळीला कमीपणा येईल असे कोणतेही कपडे यानिमित्ताने घालू नकोस, असेही काहींनी सुचवले. तिच्याकडून अशा विचित्र कपड्यांची अपेक्षा करता येत नव्हती, मग तिने असे कपडे का घातले, असेही काहींनी विचारले आहे. या एवढ्या टिप्पणीमुळे दिशा वैतागली. या कॉमेंटना उत्तर देण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्षच करणे तिने पसंत केले. मात्र या कॉमेंट जास्तच वाढायला लागल्यावर तिने चक्‍क आपल्या अकाउंटच्या सेटिंग्जमध्ये जाऊन कॉमेंट ब्लॉक करून टाकले.

यापूर्वीही दिशाला अशाच विचित्र ड्रेसकोडसाठी ट्रोल व्हावे लागले होते. फिल्मफेअर ऍवॉर्डसच्या समारंभामध्ये दिशा काळ्या रंगाचा निकोलस जेब्रान ड्रेस घालून आली होती. तेंव्हाही फॅन्सनी तिला असेच ट्रोल केले होते.

सध्या दिशा सलमान खानच्या “भारत’मध्ये व्यस्त आहे. सर्कसच्या अवती भोवती फिरणाऱ्या “भारत’च्या कथेमध्ये तिला एरोबिक स्टंटही करायचे आहेत. त्यासाठी तिने खूप जास्त ट्रेनिंगही घेतले आहे. सलमानच्या सिनेमातील रोल मिळणे खूप लकी असल्याचे तिला वाटते आहे. पण रोलबरोबर आऊटफिटकडेही तिने लक्ष द्यायला नको का.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)