दिवाळीमुळे कुरकुंभ बाजारपेठ सजली

कुरकुंभ- दिवाळीला सुरुवात झाली असून, विविध वस्तूंच्या खरेदीसाठी कुरकुंभ बाजारपेठ सजली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांत रांगोळी, पणत्या, रोषणाई आणि फराळाच्या साहित्यापासून कपड्यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसत होते. कुरकुंभ, दौंड रस्त्यला फटाके, आकाश कंदिलाचे स्टॉल गजबजले असून या ठिकाणी लोक खरेदी करताना दिसत आहेत. जास्त आवाज करणाऱ्या फटाक्‍यांऐवजी शोभेच्या फटाक्‍यांना ग्राहकांची पसंती आहे.
दिवाळी सण मोठा,नाही आनंदाला तोटा, या उक्तीप्रमाणे घराघरांत उत्साहाचे वातावरण आहे. यंदा दसरा झाल्यानंतर लगेच दिवाळीच्या तयारीला सुरवात झाली. घरोघरी स्वच्छता, रोषणाईची व्यवस्था केली जात आहे. चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा दिवाळी सण साजरा करण्यासाठी कुरकुंभ बाजारपेठ फुलून गेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)