दिवाळीनिमित्त सुका मेवाच ‘फेव्हरिट’

मोठ्या प्रमाणात बाजारात आवक 


गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव स्थिर


सुका मेवा बॉक्‍स भेट स्वरुपात देण्याला पसंती


दररोज 1 ट्रकच्या आसपास आवक

पुणे – अलीकडच्या काळांत दिवाळीला मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना सुका मेवा देण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुका मेवा चांगला असल्याने मिठाईऐवजी तो देण्यास नागरीक पसंती देत आहेत. त्यामुळे सध्या बाजारात सुका मेव्याला मागणी वाढली आहे. यंदा सुका मेव्याचे पिक चांगले असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात माल दाखल होत आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दरवर्षी दिवाळीनिमित्त विविध संस्था, कंपन्यांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचा सुका मेवा असलेले बॉक्‍स भेट स्वरुपात देण्यात येतात. तसेच, फराळातही त्याचा वापर होत असल्याने या काळात सुका मेव्याला प्रचंड मागणी असते. बाजारात काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे आदी सुका मेव्याची दररोज 1 ट्रकच्या आसपास आवक होत आहे. एरवी ही आवक आठवड्यातून 1 ट्रक एवढी असते. सध्या गोवा, बेळगावसह स्थानिक भागातून काजू तसेच तासगाव, सांगली, विजापूर, पंढरपूर येथून बेदाणा आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानातून जर्दाळू, अमेरीकेतील कॅलिफोर्निया आणि ऑस्ट्रेलिया येथून बदाम, अमेरीका, इराणमधून पिस्ता, अफगाणिस्तान, पाकिस्तानातून अंजीर, तर मध्यप्रदेश आणि ओरिसामधून चारोळीची आवक होत आहे. दरवर्षी दिवाळीसह, कोजागरी, रमजान ईद दरम्यान सुका मेव्याला मागणी वाढत असल्याचे व्यापारी राजेंद्र शिंगवी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

किरकोळ बाजारात अधिक दराने विक्री
घाऊक बाजारात बदामाला प्रतिकिलोला 650 ते 720 रुपये, पिस्ता (खारा) 900 ते 1 हजार 50, अंजीर 500 ते 800, काजु 650 ते 900, बेदाणा 200 ते 180, जर्दाळू 250 ते 400, अखरोट (गर) 850 ते 1 हजार 100 रुपये, तर काळ्या मनुक्‍याला 250 ते 450 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात यापेक्षा 15 ते 20 टक्‍के अधिक दराने विक्री केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)