दिवाळीनिमित्त पुणे विद्यापीठ राहणार आठवडाभर बंद

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दिवाळीनिमित्त सलग आठवडाभर बंदच राहणार आहे. या कालावधीत विद्यापीठातील सर्वच कार्यालये बंद राहणार आहेत.

दिवाळीनिमित्त विद्यापीठास सलग आठ दिवस सुट्टी राहणार आहे. सोमवारी (दि.5) धनत्रयोदशी, मंगळवारी (दि.6) नरक चतुर्दशी, बुधवारी (दि.7) लक्ष्मीपूजन, गुरुवारी (दि.8) दिपावली पाडवा, शुक्रवारी (दि.9) भाऊबीज, शनिवार (दि.10), रविवार (दि.11) याप्रमाणे विद्यापीठास सलग सुट्ट्या असणार आहेत. सोमवारी (दि.12) विद्यापीठाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. या सुट्ट्यांबाबत विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाच्या उपकुलसचिव सुजाता भोये यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)