दिवाळीनिमित्त किराना दुकानात ग्राहकांची गर्दी

मंचर- दिपावली सणाच्या पार्श्‍वभूमीवर मंचर, घोडेगाव येथे महिलांनी किराणा दुकानात मैदा, रवा, साखर, बेसनपीठ इत्यादी किराना वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा किराणा दुकानदारांना दुष्काळाची झळ काही प्रमाणात जाणवू लागली आहे.
मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द इत्यादी गावांतुन डिंभा उजवा कालवा व घोडनदी पाण्याने वाहत असते. त्यामुळे लांडेवाडी, नारोडी, निरगुडसर, अवसरी, पारगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी, गावडेवाडी येथील गावांतील क्षेत्र बागायती झाल्याने शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले आहे. कौलारु व मातीची घरे जाऊन दोन मजली इमारत, बंगले उभे राहिले आहेत. प्रत्येकाच्या घरी सायकल ऐवजी दोन चाकी, चारचाकी वाहने, टॅक्‍टर आले आहेत. तालुक्‍यातील प्रत्येक गावात राजस्थानी लोकांनी स्वीट होम चालू केल्याने बाराही महिने गुलाबजाम, लाडु सहज मिळत असल्याने दिवाळीचे पदार्थ बनविण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
मात्र, जुन्या पिढीतील महिला रात्री नऊनंतर चुल, स्टोव्ह किंवा गॅसवर चकली, अनारसे, शेव, लाडू, शंकरपाळी, चिवडा, करंजी बनविताना पाहावयास मिळत आहे. या वर्षी थोड्या फार प्रमाणात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्याने नागरिकांनी तयार खाद्य पदार्थ खरेदी करण्यापेक्षा दुकानातील किराणा भुसार माल घेण्यासाठी गर्दी केली आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ खुडे यांनी दिली. कापड दुकानात कापड खरेदीसाठी फारसे गिऱ्हाईक नसले तरी येत्या दोन-तीन दिवसात ऐन दिवाळीत ग्राहकांची गर्दी होईल, असा अंदाज दीपक हिंगे, भरत बांगर आणि बाळासाहेब घुले यांनी व्यक्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)