दिवाळीनंतर 1,150 एमएलडी पाणी उचलू

अतिरिक्त आयुक्तांचे खडकवासलाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र

पुणे – ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचा रोष नको, यासाठी दिवाळीनंतर 1,150 एमएलडी पाणी उचलू, असे पत्र महापालिकेने पाटबंधारे विभागाला दिले आहे. मात्र, यावर पाटबंधारे विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-Ads-

पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणी देताना गुरूवारी अक्षरश: वजनकाटा लावून पाण्याचे पंप बंद केले. त्याचा परिणाम अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी खडकवासल्याच्या मुख्य अभियंत्यांना वरील आशयाचे पत्र दिले आहे.

नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महापालिकेला 1,150 एमएलडी पाणी उचलण्याच्या सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. त्याच बरोबर पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्लाही दिला होता. याशिवाय महापालिकेला 195 कोटी रुपयांची थकीत बिलाची मागणीही पाटबंधारे विभागाने केली होती.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महापालिकेने कमी पाणी उचलणे अपेक्षित असताना अद्यापही 1350 एमएलडी पाणी उचलले जात आहे. त्यावर महापालिकेने सणासुदीचे कारण दिले आहे.

ऐन दसऱ्यातच ही पाणीकपात करावी लागणार होती. केवळ दसराच नव्हे, तर दिवाळीतही ती करावी लागणार असल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे दिवाळी झाल्यावर 1,150 एमएलडी उचलू असे पत्रात नमूद केले आहे. यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा दिला असला, तरी पाटबंधारे खात्याचे यावर काय उत्तर आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)