दिवाळीनंतर शास्ती कर सवलतीची “मिठाई’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड मधील 600 चौरस फुटाच्या निवासी बांधकामांना शंभर टक्‍के, 601 ते 1 हजार चौरस फुटाच्या बांधकामांना 50 टक्‍के शास्ती करात सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल सुरू असून दिवाळीनंतर त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल. राज्य शासनाच्या महापालिका अधिनियम कलम 267 अ मध्ये दुरुस्तीची अंमलबजावणी 4 जानेवारी 2008 पासून केली आहे. 1 हजार 1 चौरस फुटांपुढील सर्व प्रकारच्या बांधकामांना पूर्वीप्रमाणे 200 टक्के शास्ती कर आकारणार आहे, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली. शासनाने अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्याचा निर्णय 4 जानेवारी 2008 ला घेतला होता, तेव्हापासूनचा लाभ मिळणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 एप्रिल 2012 पासून शास्ती कर लागू केल्याने तेव्हापासून पूर्वलक्षी प्रभावाने शास्ती कराची सवलत मिळेल. शास्ती कराची थकबाकी असल्यास ती माफ होणार आहे. हे बदल 1 एप्रिल 2012 पासूनचे आहेत. तशी बिले नव्याने तयार केली जाणार आहेत, असेही सत्तारुढ पक्षनेते पवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडकरांना शास्ती कर माफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यास यश आले आहे. शहरातील तब्बल 50 ते 60 हजार कुटुंबांना शास्ती कराचा लाभ मिळणार आहे. तसेच त्यांची आर्थिक भूर्दंडातून सुटका होणार आहे.
– एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते, महापालिका.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)