दिवाळीत कपातीमधून दिलासा?

कपात काही दिवस मागे घेण्याबाबत हालचाली

पुणे : महापालिकेने दिवाळीनंतर लागू करण्यात येणारी पाणी कपात दिवाळी पूर्वीच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरीक तसेच राजकीय पक्षही आक्रमक झाले असल्याने दिवाळीच्या कालावधीत पुणेकरांना दिलासा देण्याच्या हालचाली महापालिकेकडून सुरू करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने 4 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत पाणीकपात मागे घेऊन पुणेकरांना पूर्णवेळ पाणी दिले जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, खडकवासला मुठा कालव्यातून पुढील दोन दिवसांत शेतीसाठीचे आवर्तन सुरू केले जाणार असल्याने महापालिकेसही दिलासा मिळणार असून लष्कर जलकेंद्रासाठी आवश्‍यक असलेले पाणी कालव्यातून घेणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे पालिकेकडून कालवा सुरू झाल्यानंतर या पाच ते सहा दिवसांत कोणतीही कपात करावी लागणार नाही असे नियोजन केले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात यावर्षी 26 टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, यावर्षी दरवर्षीच्या तुलनेने पाणी कमी असल्याने महापालिकेस मंजूर कोट्याप्रमाणेच 1,150 एमएलडी पाणीच देण्याची भूमिका घेतली आहे. तर महापालिकेस शहरात दोनवेळ पाणी देण्यासाठी 1,350 एमएलडी पाण्याची आवश्‍यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहरात एकवेळच पाणी देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून केली जाणार आहे. मात्र, या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपचीही राजकीय कोंडी झालेली असून नागरीक तसेच राजकीय पक्षांकडून पाण्यावरून भाजपला घेरल्याने तसेच ऐन दिवाळीत ही वेळ आल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांकडून या कोंडीतून किमान दिवाळीच्या आठवड्याभराच्या काळात कशा प्रकारे पुणेकरांना दिलासा देता येईल याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कालवा सुरू झाल्यास दिलासा शक्‍य – प्रशासन
खडकवासला मुठा कालव्यातून सिंचनाचे आवर्तन सुरू झाल्यास दिवाळीत काही दिवस कपातीमधून दिलासा देणे शक्‍य असल्याचे महापालिकेतील प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. कालवा सुरू झाल्यास महापालिकेस पर्वती जलकेंद्रातून कालव्यात लष्कर जलकेंद्रासाठी पाणी सोडावे लागणार नाही. सध्या लष्कर जलकेंद्राची क्षमता 225 एमएलडीची असली तरी, प्रत्यक्षात जलकेंद्रात तेवढे पाणी जाण्यासाठी महापालिकेस साडेतीनशे एमएलडी पाणी सोडावे लागते. त्यामुळे कालवा सुरू झाल्यास पालिकेची सुमारे 100 ते 150 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे दिवाळीत काही दिवस दिलासा देणे शक्‍य असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)