दिवाळीत एसटीच्या जादा फेऱ्या

पुणे – एसटी महामंडळाच्यावतीने यंदा दिवाळी सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांसाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. दिनांक 1 नोव्हेंबर पासून या विशेष बस फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले असून, दिवाळीच्या कालावधीत राज्यातील विविध बसस्थानकांमधून 9320 फेऱ्या (नियोजित फेऱ्या वगळून) सोडण्यात येणार आहेत. यासाठीचे आगाऊ आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले असुन प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.

एस.टी. महामंडळाने यंदा दिवाळीसाठी प्रदेश निहाय जादा वाहतुकीचे नियोजन केले असून, नियमित फेऱ्यांबरोबरच ज्या मार्गावर प्रवासी गर्दी आहे, अशा मार्गांवर यापूर्वीचा अनुभव विचारात घेऊन जादा बसेसच्या फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर ऐनवेळी बसस्थानकावर होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार व्यवस्थपकांनी त्वरित जादा बसेस प्रवाशी मागणीनुसार उपलब्ध करून देण्याचे आदेश मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)