दिवाळीतील वाहन खरेदी निम्म्याने घटली

– गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी कमी
– विम्यामुळे वाहनांच्या किंमती वाढल्याचा परिणाम

पिंपरी – दिवाळीतील आठ दिवसांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीत निम्म्याने घट झाल्याचे आरटीओतील वाहन नोंदणीवरुन स्पष्ट झाले आहे. वाहन उद्योगावरील मंदीचे मळभ पुर्णतः दूर झाले नाही. त्यातच विमा महागल्याने वाहनांच्या किंमतीत सात ते दहा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. त्याचा परिमाण वाहन खरेदीवर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दिवाळीत विशेषतः पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी शुभ मानले जाते. आरटीओसाठीही हा काळ सुगीचा मानला जातो. वाहन नोंदणीच्या माध्यमातून आरटीओला चांगला महसूल मिळतो. दरवर्षी वाहन खरेदीच्या संख्येत वाढ होत असते. मात्र, यंदाची दिवाळी वाहन विक्रेत्यांसह आरटीओसाठीही निराशाजनक ठरली. गतवर्षी दिवाळीच्या आठ दिवसांमध्ये 5 हजार 924 वाहनांची नोंदणी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाकडे झाली होती. मात्र, यंदा अवघ्या 2 हजार 459 वाहनांची नोंदणी झाली आहे.

वाहन उद्योगावर अद्याप मंदीचे मळभ आहे. त्यातच नवीन वाहनांची नोंदणी करताना दुचाकींसाठी पाच वर्षांचा, तर मोटारींसाठी तीन वर्षांचा विमा (किमान थर्ड पार्टी) काढणे बंधनकारक केल्यानंतर आता मालक-चालकाचा 15 लाखांचा अपघात विमा काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांचा विमा महागला आहे. परिणामी वाहनांच्या किंमतीत पाच ते सात टक्के वाढ झाली आहे. या विम्याचा लाभ संबंधित वाहन मालकाच्या कुटुंबियांना होणार असला तरी तूर्तास ऐन दिवाळीत खिसा हलका होणार असल्याने ग्राहकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरविली आहे.

वर्ष – एकूण नोंदणी – दुचाकी – चारचाकी
2017 – 5924 – 5072 – 852
2018 – 2459 – 2022 – 437

यावर्षी दसऱ्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी वाहन नोंदणी झाली होती. दिवाळीतही नोंदणीचा आकडा कमी आहे. मंदीचे सावट अद्यापही वाहन खरेदी-विक्री क्षेत्रात दिसून येत आहे. सहाजिक त्याचा परिणाम आरटीओच्या महसुलावर होत आहे.
– आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)