दिवाळीच्या मुहूर्ताला ‘वेल्थ क्रिएशन’साठी काही कंपन्या (भाग-१)

एकदा का दसरा संपून दिवाळीचे वेध लागले की घरोघरी सुगरणींना फराळ बनवण्याची उत्सुकता असते, मुलांना किल्ला करण्याबाबत व नवीन कपडे घेण्याबाबत आकर्षण वाटू लागतं तर बाजारातील गुंतवणूकदारांची दिवाळीच्या मुहूर्त खरेदीबद्दल चाचपणी चालू होते. आता मुहूर्त तर नावाला असतो, खरा मुहूर्त म्हणजे रास्त भावात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणं व आपला नफा पदरात पाडून ते योग्य वेळी विकून टाकणं. मुहूर्ताच्या निमित्तानं एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक परिस्थितीत आपण गुंतवणूक केलेलीच असली पाहिजे (इन्व्हेस्टेड असणं) असा अट्टाहास ठेवणं चुकीचं आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत बाजारापासून दूर राहणं देखील काही वेळेस हितावह ठरू शकतं. एकूणच पुढील सहा महिने बाजाराबद्दल मतं मांडणं चुकीचं ठरू शकतं. त्यामुळं खरेदी केल्यानंतर वेळोवेळी फायदा झाल्यावर त्यातून आपली मुद्दल काढून घेण्यातच शहाणपण आहे. फारच हातचं राखून खरेदी करणाऱ्यांनी आपली खरेदी पडत्या बाजारात२-३ टप्प्यांमध्ये केल्यास चांगल्या सरासरीमुळं त्यांतील जोखीम देखील थोडी कमी होऊ शकते.

जर ढोबळमानानं आपल्या जीडीपीच्या वाढीचा दर जर ७-८ टक्के गृहीत धरला आणि आजचा महागाईदर हा साधारणपणे ६ टक्क्यांच्या आसपास विचारात घेतला तर आपणगुंतवणुकीमधून १५ टक्के परताव्याची अपेक्षा ठेवू शकतो. अर्थात, प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी असू शकते. काहींना आपला पोर्टफोलिओ वर्षोनुवर्षं तसाच ठेवून देण्यात आनंद वाटतो तर काहींना आपल्या खरेदीमधून व्याजाच्या हिशोबाप्रमाणे नफा कमावण्यात धन्यता वाटते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाळीच्या मुहूर्ताला ‘वेल्थ क्रिएशन’साठी काही कंपन्या (भाग-२)

पुढील महिन्यांतील चार राज्यांतील निवडणुका (ज्या पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत) तसेच सर्व जगाचं लक्ष लागून राहिलेली मे २०१९ मधील लोकसभा निवडणूक, कच्च्या तेलाचे व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर, एनबीएफसी बाबत असलेली साशंकता व इतर परिणामात्मक जागतिक घडामोडी पाहता ज्याप्रमाणं ब्ल्यू चिप कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करण्यासाठी मागेजशा २-३ पातळ्या सुचवल्या होत्या त्याचप्रमाणे दीर्घकालीन गुंतवणूक न करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना आपण मध्यमकालीन ट्रेडर्स म्हणू शकतो अशांनीकेलेल्या गुंतवणुकीतून नफा बाहेर काढण्याकरितादेखील काही उद्दिष्ट पातळ्या देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)