दिवाळीच्या मुहूर्ताला ‘वेल्थ क्रिएशन’साठी काही कंपन्या (भाग-२)

दिवाळीच्या मुहूर्ताला ‘वेल्थ क्रिएशन’साठी काही कंपन्या (भाग-१)

मागील लेखात आपण निफ्टी ५० मधील कंपन्यांसाठी निफ्टी १०००० च्या पातळीवर असताना (खरेदी केल्यानंतर जर बाजार त्याही खाली गेला तर) पडत्या बाजारात खरेदीसाठी अनुकूल पातळ्या पहिल्यातर आजच्या लेखात प्रामुख्यानं दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (वेल्थ क्रिएशन), काही ब्ल्यू-चिप कंपन्या गुंतवणुकीसाठी सुचवत आहे. त्यातून आपणांस “भावणारी” कंपनी निवडणं हे दिवाळी आधीची पूर्वतयारी करण्यासारखं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एचडीएफसी बँक –  बहुतांशी म्युच्युअल फंड मॅनेजर्सची सर्वात लाडकी कंपनी म्हणून या बँकेचा नावलौकिक आहे. मागील तिमाहीत विविध म्युच्युअल फंड्सच्या ४८५ स्कीम्सनी या शेअरची खरेदी केलीय. मागील लेखात स्पष्ट्पणे उल्लेखल्याप्रमाणंटप्प्याटप्यानं खरेदीसाठी या शेअरसाठी १९०० व १७६० ह्या पातळ्या सुचवल्या होत्या त्याप्रमाणे मागील आठवड्यात १८८५ वरून हा शेअर फिरला आहे. वरील बाजूस याचे उद्दिष्ट हे २०५० असावं.

आयसीआयसीआय बँक – खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी असणारी ही बँक. एकूणच इतर बँकांपेक्षा मागील एका वर्षातील आलेख हा वेगळा आहे. मागील वर्षी देखील हा शेअर दिवाळीसाठी २७० रुपयास सुचवला होता. एकूणच यासाठी पाहिलं उद्दिष्ट हे ४०० रुपये तर पुढील उद्दिष्ट हे ४४० च्या आसपास असावं.

बजाज फायनान्स – एकूणच पर्सनल व ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी कर्ज देण्यात अग्रेसर असणारी ही कंपनी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. आताच्या भावात खरेदी केलेली असल्यास पुनर्खरेदीसाठी २०४० हा भाव योग्य वाटतो तसेच वरील बाजूस २६०० व २७५० दरम्यान विक्री करून नफा पदरात पाडता येऊ शकतो.

अरबिंदो फार्मा – मूलभूत अभ्यासानुसार केवळ १९ पीईच्या आसपास मिळणारा हा शेअर पडत्या बाजारात तग धरून आहे. अमेरिकेतील बाजारात आपल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वांत अग्रेसर आहे. तसंच अमेरिकेतील जेनरिक औषधांचा प्रमुख पुरवठादार म्हणून देखील या कंपनीकडं पाहिलं जातं. ७१० रुपयांवर पुनर्खरेदीस अनुकूल वाटणारा हा शेअर दीर्घ गुंतवणुकीसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असण्यास हरकत नाही.

रिलायन्स – आधी फक्त रिफायनरी व पेट्रो-केमिकल म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी नंतर उत्पादन, रिटेल, डिजिटल सेवा, टेलिकॉम व आता नवीन घोषणेनुसार ब्रॉडबँड व डीटीएच इ. सेवेत अग्रेसर म्हणून गणली जाणारी बहुविध कंपनी असून येणाऱ्या वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देऊ शकते.

टीसीएस – भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणजे टीसीएस. टाटा समूहातील ही कंपनी जगातील एकूण ४६ देशांत कार्यरत आहे. घसरलेला रुपयाचा भाव ही या कंपनीची जमेची बाजू आहे. नुकत्याच दिलेल्या बोनस नंतर कंपनीचा शेअर हा २२७६ रुपयांवरून १९०० रु. भावाच्या आसपास व्यवहार करत आहे. पोर्टफोलिओमधील एक बचावात्मक शेअर म्हणून या कंपनीच्या शेअरकडं पाहता येऊ शकतं.

अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स – भारतातील सर्वांत फायदेशीर अशी डी-मार्ट सुपरमार्केट स्टोअरचे मालकी हक्क असणारी व ते चालवणारी कंपनी म्हणजे अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात कंपनीची उत्पन्नातील वाढ ही ३९ टक्के दिसून आली. अन्न, एफएमसीजी, सर्वसाधारण उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं व वस्रोद्योग इ. गोष्टी कंपनी आपल्या १६० स्टोर्सद्वारे ग्राहकांपर्यंत पुरवत आहेत यावरून कंपनीच्या व्यवसायाचा आवाका दिसून येतो.

इंडिगो – विमान वाहतूक बाजारातील जवळपास ४१ टक्केहिस्सा बाळगणारी ही कंपनी असून सध्याच्या परिस्थितीत इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यानं कंपनीनं मागील तिमाहीत नुकसान जाहीर केलंय. सध्याच्या भावात जरी कंपनी महाग वाटत असली तरी एकूण त्यांचा बाजारातील हिस्सा, सुटीचा हंगाम व हवाईवाहतुकीसाठी वाढत असणारी मागणी या गोष्टी येणाऱ्या दिवसांत कंपनीच्या पथ्यावर पडतील.

एल अँड टी – ही भारतस्थित इंजिनिअरिंग कंपनी असून वाहतूक, प्रक्रिया अभियांत्रिकी, औद्योगिक उत्पादनं, वैद्यकीय उपकरणं व टेलिकॉम इ. क्षेत्रांत सेवा पुरवते. तसेच अनेक क्षेत्रांत सल्ला व मार्गदर्शन देखील पुरवते. २०१८-२०२० वर्षांतर्गत आर्थिक उत्पन्नातील १८ टक्के वार्षिक वाढ एक चांगल्या गुंतवणुकीची संधी ठरू शकते. इन्फ्रास्ट्रक्चर, हायड्रोकार्बन व अवजड अभियांत्रिकी व्यवसायातील एकूण २.७ लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स कंपनीच्या व्यवसायातील प्रगती निश्चित करतात.

यांव्यतिरिक्त, याआधील लेखात आपल्या पुस्तकी मूल्यापेक्षा कमी भावात उपलब्ध असलेल्या व कमी कर्ज असणाऱ्या कंपन्यांची यादी दिलेलीच होती. त्यामधील कंपन्या पडत्या भावात खरेदी केल्यास व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा अनुभव घेता येऊ शकतो.

“In Bible, it says that love covers a multitude of sins. Well in the Investing, price covers a multitude of mistakes. For human beings, there is no substitute for love. For investing, there is no substitute for paying the right price – absolutely none.” – Arnold Van Den Berg, Outstanding Digest, April 2004. पवित्र बायबलमध्ये (१ पेत्र ४:८) म्हटलंय की प्रीति पापांची रास झाकून टाकते. तसंच, गुंतवणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेअरचा भाव हा अनेक चुका झाकतो. मनुष्यप्राण्याकरिताप्रीतिला कोणताही पर्याय नाही तर गुंतवणूक करताना देखील (उत्तम कंपनीच्या शेअरला) योग्य भाव देण्यासाठी देखील कोणताही पर्याय नाही.म्हणून योग्य भावात खरेदी केली कोणतीही सर्वसामान्य कंपनी नफा देऊन जाते परंतु एखादी चांगली कंपनी चुकीच्या भावात खरेदी केल्यास कधी कधी पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. म्हणून पुढील दिवाळीपर्यंत ट्रेडर बनायचं की इन्व्हेस्टर हे ठरवायला नक्कीच कोणत्या मुहूर्ताची गरज नाही, बघा पटतंय का !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)