दिवाळीच्या गोडव्याला मिठाईचा साज

बाजारात वेगवेगळ्या मिठाईला मागणी; काजु कतलीचा भाव वधारला

सातारा, दि.2 (प्रतिनिधी) – दिवाळी हा सण जसा दिव्यांच्या लखलखाटाचा तसाच फराळांच्या गोडव्याचा आहे. घरगुत्ती फराळाच्या सोबतीला बाजारात असलेल्या विविध प्रकाराच्या मिठाई दिवाळीच्या गोडव्यात भर टाकत आहेत. साताऱ्यात दिवाळीचे निमीत्त साधत अनेकांनी मिक्‍स मिठाईला आपली पसंती दिली आहे. मात्र काजु कतलीचा भाव यंदा चांगलाच वधारला आहे.
काजू कार्निवल, रोझ, मॅंगो अशा फ्लेवरमधली काजू कतली, खीर बदाम, गुदेन संदिल… अशा विविध प्रकारच्या मिठायांनी मिठाईची दुकाने सजू लागली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 08 ते 12 टक्के दर वाढूनही ग्राहक मिठाईला पसंती देत आहेत. मिठाई खरेदीला अजून म्हणावा तसा वेग नसला तरी येत्या चार दिवसांत मिठाई मार्केट तेजीत येईल, अशी चिन्हे आहेत. मिठाईचे विविध प्रकार मार्केटमध्ये असले तरी काजू कतलीचा भाव चांगलाच वधारला आहे.
सुकामेवा, तसेच चॉकलेटच्या भेटी देण्याचे प्रमाण वाढल्याने दिवाळीत मिठाई उद्योगाला चांगलीच स्पर्धा जाणवू लागली आहे. विविध प्रकारच्या मिठायांचे शौकिन असणाऱ्यांची पावले साहजिकच मिठाईवाल्यांच्या दुकानाकडे वळू लागली आहेत. इतर दिवसांपेक्षा दिवाळीत मिठायांचे वेगवेगळे प्रकार सादर करण्यावर व्यवसायीकांडुन भर दिला जात आहे. यंदा मिठाईचे दर 800 ते 1400 रुपये किलोपर्यंत असले तरी ग्राहकांची चांगली मागणी असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. लोक मिक्‍स मिठाईला प्राधान्य देत आहेत, मिक्‍स मिठाईचे विविध पॅकींग खरेदी करण्याकडे लोकांचा कल असल्याचे सांगण्यात येते. हलवा मिक्‍स, आईस्क्रीम, गोल्डन हलवा असे विविध प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, भेटी देण्यासाठी आजही लोक काजू कतलीचीच निवड करतात. दरवर्षीप्रमाणे आगाऊ नोंदणीला अजून तरी म्हणावी तशी गती आलेली नसली तरी येत्या तीन दिवसांत ग्राहकांची गर्दी वाढेल. असा अंदाज आहे.
चौकटदिवाळीला भेट देण्यासाठी आतापर्यंत शहरातून 5 हजार बॉक्‍सची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा कमालीचा वाढण्याची शक्‍यता आहे.शहरातील अनेक मिठाई दुकानात विविध प्रकारच्या मिठायांची रेलचेल आहे. रोज बॉल, मॅंगो बर्फी, मलाई डोसा, सोनपापडी, मिक्‍स काजू, केशर काजू, पेढा, या प्रकारच्या मिठाया लोक घेतात. असे असले तरी काजू कतली लवकर खराब होत नसल्यामुळे दिवाळी भेटीसाठी मिठाईच्या या प्रकाराला प्राधान्य दिले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)