दिवसा कडक उन्ह,रात्री बोचरी थंडी

वातावरणातील बदलाने आजाराचे प्रमाण वाढले

नागठाणे – गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र झाल्याने दिवसाच्या तापमानात वाढ तर रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे.त्यामुळे दिवसा कडक उन्ह तर रात्रीला बोचरी थंडी असे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर ही पडत आहे. या वातावरणामुळे सर्दी, पडसे, ताप व खोकल्याच्या आजारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसात कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा एक दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे दिसून येते होती तर आता दोन-तीन दिवसात दिवसाच्या तपमानात व रात्रीच्या तापमानात बराच फरक पडत आहे. आपल्याकडे ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर महिना लहान उन्हाळा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या महिन्यात दिवसा कडक ऊन असते तर नोव्हेंबर लागताच रात्रीच्या किमान तपमानात घट होऊ लागते. साधारणतः दिवाळीपासून आपल्याकडे थंडीची चाहूल लागते.

डिसेंबरमध्ये जम्मू-काश्‍मीर व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत असतो. उत्तर भारतातून दक्षिणेकडे येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचे प्रमाण अधिक असते. गेल्या आठवड्यात ढगाळी वातावरण होते. लगेच दोन दिवसात आकाश निरभ्र झाले. या हवामानातील बदलामुळे सर्दी, थंडी वाजून ताप येणे, खोकला, डोके दुखणे, अंग दुखणे आदी आजारांत वाढ झाली आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम वृद्ध आणि लहान मुलांवर लगेच होत असतो. दमा असलेल्या रुग्णांना थंडीचा अधिक त्रास होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)