दिवसा उकाडा, रात्री मात्र गारवा

File Pic

राज्यात किमान तापमानातही घसरण

पुणे – दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे वातावरण सध्या राज्यात अनुभवायला मिळत आहे. त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमानातही तब्बल 15 ते 20 अंशांनी फरक पडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“ऑक्‍टोबर हीट’नंतर आता राज्यात थंडी पडू लागली आहे. पण, दिवसाच्या कमाल तापमानात अजूनही घट झालेली नाही, तर दुसरीकडे रात्रीच्या किमान तापमानात मात्र घट होऊ लागली आहे. त्यामुळे सकाळी आल्हाददायक थंडी, तर दुपारी कडाक्‍याचे ऊन असे हवामान आहे. सप्टेंबरपासून राज्यात उकाडा जाणवत होता. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत रात्रीच्या किमान तापमानात घट झालेली नव्हती. आतासुद्धा किमान तापमानात फारशी घट झालेली नाही. सोमवारीसुद्धा राज्यात सर्वाधिक तापमान हे सांताक्रुझ येथे 38.0 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अजूनही राज्यात अनेक ठिकाणी दिवसाचे किमान तापमान हे 35 अंशाच्या जवळपास आहे. पुण्यातही सोमवारी तापमान 33 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात घट होत आहे. अनेक ठिकाणी हे तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होत आहे. राज्यात आज सर्वांत कमी तापमान नगर येथे 13.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातही तापमान 14 अंशापर्यंत घसरले होते. सोमवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रात दिवस रात्रीच्या तापमानात 10 ते 23 अंश, कोकणात 12 ते 15, मराठवाड्यात 18 ते 22 अंशांची तर विदर्भात 14 ते 19 अंशांची तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील किमान तापमान घटणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)