दिवसाला 45 कि.मी. महामार्ग उभारणार

नवी दिल्ली -आपल्या क्षमतेपेक्षा मोठे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी प्रसिध्द नितीन गडकरी यांनी यंदा दिवसाला 45 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतली आहे. गडकरी यांनी यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्के जास्त महामार्ग बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा 20 हजार किमीच्या कामाची निविदा काढली जाईल आणि 16420 किमीचे रस्ते पूर्ण केले जातील, अशी हमी गडकरी यांनी आज दिली.

मागच्या वर्षी 17055 किमीसाठी निविदा काढण्यात आली होती. मंत्रालयाच्या वतीने 9700, नॅशनल हायवे अथॉरिटी 6000 आणि नॅशनल हायवे अँड इंफ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंटच्यावतीने 720 किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. मागच्या वर्षी दिवसात 27 किमीचे रस्ते तयार होत होते आता 45 किमी लांबीचे तयार होतील. याशिवाय तत्वतः मंजुरी मिळालेल्या रस्त्यांचे डीपीआर पूर्ण करण्यावरही भर राहणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)