दिवसात फक्त 440 एमएलडी पाणी उपसा करा

पिंपरी  – परतीचा पाऊस सरासारी न झाल्याने भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जाऊ नये, याकरिता आतापासूनच खबरदारी घेण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने अवलंबले आहे. पवना धरणातील पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी महापालिकेने दिवसाला 440 एमएलडी एवढाच मर्यादित पाणी उपसा करण्याची सुचना या विभागाने केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पवना धरणातील पाणी उपशाबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याच्या काटसकरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले आहे.
पिंपरी -चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक 4.84 टीएमसी पाणी वापरास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून रावेत बंधाऱ्यापर्यंत पवना नदीची लांबी 40 किलो मीटर असून पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्यापर्यंत पोहचण्यास तब्बल 14 तासाचा वेळ लागतो. पवना धरणातून महापालिका दररोज 480 ते 500 एमएलडी पाण्याचा उपसा करते. रावते बंधाऱ्यातून पाणी उपसा करुन शहराच्या विविध भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. सध्या रावेत बंधाऱ्यात काही प्रमाणात गाळ साचल्याने बंधाऱ्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. या बंधाऱ्यातील पातळी थोडी जरी कमी झाली तरी महापालिकेचे पाणी उपसा पंप बंद पडतात. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो.
सद्यस्थितीत महापालिका मंजुरीपेक्षा अधिक पाणी उचलत आहे. रावेत बंधाऱ्यातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून अधिक विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणीसाठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणीवापर 440 एमएलडी मर्यादीत ठेवण्याबाबत नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे.

पाणीगळती रोखण्याचे महापालिकेसमोर आव्हान
पिंपरी-चिंचवड शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी गळती व चोरी होण्याची टक्केवारी 35 ते 40 एवढी आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा पुरसा विसर्ग झाल्यानंतरही शहरात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या कायम तकोरी येत आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत पाणी प्रश्‍नावरील चर्चेनंतर सभा तहकुब करण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर आली होती. पाण्याची बचत करण्यासाठी गळती व पाणी चोरी रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)