दिवसभर ढगाळ वातावरण; कमालीचा उकाडा 

राज्यात परभणी सर्वांत हॉट


पारा 42.6 सेल्सिअस अंशांवर

पुणे- मागील आठ दिवसांपासून “सूर्यनारायण’ तापले आहेत. त्यामुळे शहरासह राज्यातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात परभणी येथे सर्वाधिक 42.6 सेल्सिअस अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात शुक्रवारी अधून-मधून ढगाळ वातावरण असल्यामुळे कमाल तापमानात किंचतशी घट झाली असली तरी उकाडा कायम आहे.

विदर्भाच्या संपूर्ण भागात तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील. तर 31 मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

पुणे शहरात मागील आठ दिवसांपासून उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी पहायला मिळत आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री हवेत गारवा असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्‍न उद्‌भवत आहे. या आठवड्यात शहरातील कमाल तापमान 40 सेल्सियस अंशापर्यंत पोहचले होते. शुक्रवारी शहरात 38.6 तर लोहगाव येथे 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी (दि. 30) दिवसभरातील काही प्रमुख शहरांमधील कमाल तापमानाच्या नोंदी

परभणी 42.6, अकोला आणि चंद्रपूर 42.5, ब्रह्मपुरी 42.1, नांदेड, वर्धा, यवतमाळ आणि भिरा 42, जळगाव 41.6, अमरावती 41.2, बीड आणि नागपूर 41, गोंदिया 40.3, लोहगाव 40.1, औरंगाबाद आणि बुलढाणा 39.6, नाशिक आणि सांगली 39, पुणे 38.6, सातारा 38.5.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)