दिवड येथील अजय सावंत यांना राष्ट्रपती पोलीस पदक

प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य; 26/11 च्या दहशतवादी हल्ला कारवाईमध्ये सहभाग
दहिवडी, दि. 24 (प्रतिनिधी) – माण तालुक्‍यातील दिवड गावचे सूपूत्र व मूंबई येथील खंडणी विरोधी पथक प्रमुख येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय खशाबा सावंत यांना प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल व राष्ट्रपतीची गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हे पदक देवून गौरविण्यात येणार आहे.
माण तालुका हा कायम दुष्काळी असला तरी या तालुक्‍यात अनेक हिरे जन्माला आली आहेत. अशाच एक हिरा म्हणजे अजय खशाबा सावंत. माण तालुक्‍यातील दिवड या गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात अजय सावंत यांचा जन्म झाला आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले आहे. सोमय्या कॉलेजमधून एलएल. बी. झाले. सन 1993 मध्ये ते पोलीस सब इन्स्पेक्‍टर (पीएसआय) मुलुंड , घाटकोपर येथे रूजू झाले. पीएसआय असताना त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. सन 1994 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर बढती देण्यात आली. याही पदावर उत्कृष्ट असे काम केले आहे. सन 2005 साली मुंबई क्राईम ब्रॅंच येथे काम करण्याची संधी मिळाली. छोटा राजन गॅंगस्टरच्या छोटा राजनच्या भावासह 18 जणांना अटक केले होते. 2007 साली पाकिस्तानी हेरांना पकडून अटक केली होती. 2008 साली इंडियन मूजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेतील 23 जणांना विविध ठिकाणी अटक केली होती. त्यांनी हैद्राबाद, मुंबई, जयपूर या ठिकाणी बॉंब ब्लास्ट केले होते. सन 2008 साली मुंबई झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्लाच्या कारवाईमध्ये सहभाग होते. 2008-09 मध्ये जे. डी. हत्याकांडातील मुख्य आरोपींना पकडण्यात मोठे यश मिळवले. त्याचबरोबर छोटा राजनचा राईट हॅंड फरिद तानाशा यांच्यासह 9 जणांना अटक करून जन्मठेपेची शिक्षा करण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच एका वर्षात रवी पुजारी, सुरेश पूजारी व अनिस इब्राहिम यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. आतापर्यंत अजय सावंत यांनी 30 आरोपींना अटक केली आहे.
आज ते स्वकर्तृत्वावर पोलीस खात्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप निर्माण केली आहे. म्हणून त्यांना स्वातंत्र्य दिनी शासनाने राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, मुंबई अतिरिक्त आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, अशोक सावंत (शेठ), सदाशिव सावंत, पै. हणमंत पाटील, सरपंच रामभाऊ सावंत, रामचंद्र सावंत, उपसरपंच दादासो सावंत, नवनाथ सावंत, निलेश सावंत, किरण सावंत, रामभाऊ पुढारी, सयाजीराव लोखंडे, सुनिल भोसले, जगन्नाथ सावंत, संजय वाघ, नाना लोखंडे यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)