दिल्ली हायकोर्टाने दिला आपला दिलासा

आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांची बडतर्फी रद्द


केजरीवाल म्हणाले सत्याचा विजय झाला

नवी दिल्ली – लाभाचे पद भूषवले या कारणावरून दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांचे सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केले होते. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा हा निर्णय रद्दबातल ठरवला असून या प्रकरणात प्रत्येक आमदाराची केस व्यक्‍तिगत पातळीवर तपासण्याचा आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सत्याचा विजय झाला आहे. दिल्लीच्या जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना बेकायदेशीरपणे अपात्र ठरवण्यात आले होते पण दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील जनतेला न्याय दिला आहे. निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवल्याने त्या ठिकाणी पोटनिवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. पण न्यायालयाच्या निर्णयामुळे आता हा धोका टळला आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे 70 पैकी 67 आमदार निवडून आले असल्याने त्यांचे तेथे आधीच एकतर्फी बहुमत होते.

20 आमदार अपात्र ठरवण्यात आल्यानंतरही त्यांच्या सरकारला काही धोका नव्हता. या प्रकरणात निवडणूक आयोगाने आपली बाजूच ऐकून न घेता परस्पर हा निर्णय दिला, असा आपचा युक्‍तिवाद होता. तो न्यायालयाने ग्राह्य मानून प्रत्येक केसचा व्यक्‍तिगत स्वरूपात विचार करून मेरीटवर त्या विषयी निवाडा करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)