दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्‍लिनीक योजनेचे संयुक्तराष्ट्रांच्या माजी सरचिटणीसांकडूनही कौतुक

नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने त्या राज्यातील गरीबांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोहल्ला क्‍लिनीकची योजना यशस्वीपणे राबवली असून त्यांच्या या योजनेचे संयुक्तराष्ट्रांतील सरचिटणीस बान की मून आणि नॉर्वेचे माजी पंतप्रधान ग्रो हार्लेम ब्रन्डटलॅंड यांनीही स्वागत केले आहे.

मून यांनी स्वत: यातील काही क्‍लिनीकला भेट दिली. त्यानंतर त्यांनी म्हटले आहे की दिल्लीच्या पश्‍चिम विहार भागातील पीरगडी मोहल्ला क्‍लिनिकला आपण भेट दिली तेथील काम पाहून आपण खूप प्रभावित झालो आहोत असे त्यांनी म्हटले आहे. या भेटीच्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हेही उपस्थित होते. ब्रन्डटलॅंड यांनी म्हटले आहे की हा प्रकल्प संपुर्ण देशभर राबवण्याची गरज आहे.

ब्रन्डटलॅंड यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक पदही भुषवले आहे त्यामुळे त्यांनी या उपक्रमाचे जे कौतुक केले त्याला विशेष महत्व आहे. केजरीवालांनी त्यांना माहिती देताना सांगितले की दिल्लीत अशा प्रकारची एकूण 189 क्‍लिनिक्‍स उघडण्यात आली असून एकूण एक हजार क्‍लिनिक उघडण्याचा सरकारचा इरादा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)