सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली सरकार व महापालिकांवर ताशेरे
नवी दिल्ली – राजधानी दिल्ली शहरातील भुजल स्तर दिवसेंदिवस खूप खालावत चालल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार व दिल्लीतील विविध महापालिकांवर जोरदार ताशेरे मारले आहेत. या गंभीर समस्येकडे राज्य सरकार व महापालिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

निती आयोगाच्या अहवालातही या विषयावर गांभीर्याचा इशारा देण्यात आला आहे. पण प्रत्येक जण आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होत आहे त्यातून ही स्थिती आणखीनच गंभीर होत जाणार असून त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत हे लक्षात घ्या अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

भुजलातील पाण्याचा वापर कमी करण्यासाठी तुम्ही काहींहीं करीत नाही, या पाण्याची पातळी वाढवण्याकडेही तुमचे दुर्लक्ष आहे असे मत न्या. मदन लोकुर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने व्यक्त करीत राज्य सरकार व महापालिकांना या प्रकरणात दोष दिला. दिल्लीत जमीनीखालील पाण्याचा बेसुमार वापर होंतो आहे.तो रोखण्यासाठी कोठेच उपाययोजना होताना दिसत नाहीं. त्याबद्दल न्यायालयाने गेल्या 8 मे रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळीच चिंता व्यक्त केली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)