दिल्ली विमानतळावर लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्‍याला अटक

नवी दिल्ली – लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या हबीबुर रहमान या अतिरेक्‍याला रविवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. मूळचा ओडिशा केंद्रपाडाचा रहिवाशी असलेला हबीब सध्या सौदी अरेबियात रियाध येथे वास्तव्याला होता. सौदी अरेबिया मधुन भारतात आलेल्या हबिबला ताब्यात घेतल्या प्रकरणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अतिरेकी भारतात येत असल्याची माहिती सौदी अरेबिया येथील तपास यंत्रणेने आम्हाला दिल्या नंतर आम्ही हि कारवाई केली आहे.
सदर प्रकरणी दोन्ही देशांमधिल तपास यंत्रणां मधिल समन्वय दिसून येतो.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार हबीबुर रहमानने शेख अब्दुल नईम उर्फ नोमी या दहशतवाद्याला मदत केली होती. नोमीला 2007 मध्ये दोन पाकिस्तानी आणि एका काश्‍मिरी दहशतवाद्याला बांगलादेशमार्गे भारतात घुसवण्याचा प्रयत्न करत असताना अटक झाली होती. तर, त्यानंतर ऑगस्ट 2014 मध्ये नईमला एका खटल्याच्या सुनावणीसाठी कोलकाताहून महाराष्ट्रात आणण्यात येत असताना तो फरार झाला होता.

-Ads-

त्यानंतर नईम पाकिस्तान मधल्या आपल्या मोहरक्‍यांच्या इशाऱ्यावरुन काम करु लागला. भारतात कुठे दहशतवादी हल्ला करता येऊ शकतो त्याच्या जागा निवडण्याची जबाबदारी नईमवर सोपवण्यात आली होती. त्यासाठी नईमने वेगवेगळी बनावट नावे धारण केली.

जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, चंदीगड या राज्यांमध्ये जाऊन त्याने दहशतवादी हल्ल्यांसाठी जागांची पाहणी केली. त्यावेळी हबीबुर रहमानने त्याच्या रहाण्या व खाण्याची तसेच लपण्याची आणि पैशांची सर्व व्यवस्था केली होती. लष्करचा दहशतवादी अमजद उर्फ रेहानच्या सांगण्यावरुन त्याने ही सर्व व्यवस्था केली होती. नईमला पुन्हा नोव्हेंबर 2017 मध्ये अटक करण्यात आली. हबीबुर रहमानची कोठडी मिळवण्यासाठी त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)