दिल्ली-गुरूग्राम महामार्गावर पावसामुळे वाहतूकीचा खोळंबा

नवी दिल्ली : मान्सूनने आता संपुर्ण देश व्यापून टाकला असल्याचे दिसत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनने 6 दिवस अगोदर आगमन केल्याने देशातील बळीराजा सुखावला आहे. त्यातच काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावून नागरिकांचे हाल केल्याचेही समोर येत आहे.

दरम्यान, दिल्ली-गुरूग्राम महामार्गावर अशाच काही परिस्थितीला नागरिकांना तोंड द्यावे लागले आहे. अचानक आलेल्या पावसाने दिल्लीतील चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. एवढेच नाही तर महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूकीचाही मोठा खोळंबाही झाला. पावसामुळे महामार्गावरील वाहतूक संथगतीने पुढे सरकत होती तर काही नागरिकांना याच पाण्यातून पायी वाट काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. दरम्यान, आणखी मुख्य पावसाळा सुरू होण्याच काही काळ असला तरी आतापासूनच नागरिकांचे हाल होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)