दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या

मागणीसाठी आपची मोदींना दहा लाख पत्रे
नवी दिल्ली – दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या अशी मागणी करणारी तब्बल दहा लाख पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली जाणार आहेत अशी माहिती आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी दिली.

यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या आहेत. या संबंधात बोलताना गोपाल राय यांनी सांगितले की केंद्र सरकारने कायमच दिल्लीला सापत्न भावाची वागणूक दिली असून या सरकारला स्वतंत्र राज्याचा दर्जा नसल्याने प्रत्येक बारीक-सारीक निर्णयासाठी केंद्र सरकारकडे धाव घ्यावी लागते केंद्र सरकारला त्यात स्वारस्य असल्याचेही कधी दिसले नाही त्यामुळे आपला विकास आपल्यालाच करता यावा यासाठी दिल्ली सरकारला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणे अगत्याचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मागणीसाठी दिल्ली विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन जून महिन्यात घेण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)