दिल्लीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली – दिल्लीतील अशोक विहार परिसरात एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी तीन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मृतांमध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही इमारत अतिशय जूनी असल्याने कोसळल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)