दिल्लीत 3 दहशतवाद्यांना अटक 

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी इस्लामिक स्टेट जम्मू-काश्‍मीर (आयएसजेके)चे असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

दिल्ली पोलिसांना मंगळवारीच दिल्लीत दोन अतिरेकी घुसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर दिल्लीतील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. याशिवाय संशयित अतिरेक्‍यांची छायाचित्रेही जारी केली होती. मात्र हे अटक झालेले अतिरेकी तेच आहेत का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

-Ads-

हे दहशतवादी दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्यांच्या मनसुब्याने घुसले होते. अलर्टनंतर पोलीस गेस्ट हाऊस, हॉटेलांसह अनेक ठिकाणी तपासणी करत होते. जिथे परदेशी नागरिक मोठ्या संख्येने येतात अशी ठिकाणे पोलिसांच्या रडारवर होती. दरम्यान, मंगळवारीच दिल्लीत हिज्बुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक इम्तियाज अहमदची हत्या झाली होती. अहमद यांची हत्या करणारा अंसार “उल हक’ या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने अटक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)