दिल्लीत ४० कोटींचे हेरॉईन जप्त ; दोन आरोपी जेरबंद

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने आज १० किलो हिरोईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. जवळजवळ ४० कोटींचा हा अमली पदार्थ असून हिरोईनसह दोन आरोपींना जेरबंद केले आहे. हे हिरोईन  कुठून आणले होते आणि ते कुठे घेऊन जात होते याबाबत पोलीस तपास करीत आहेत. ह्या वर्षातील अमली पदार्थ जप्त करण्यात आलेली हि दुसरी कारवाई आहे.

फेब्रुवारी महिन्यात विशेष विभागाने कारवाई करत २.५ किलो अफगाण हिरोईन जप्त करत तिघांना द्वारका येथील सेक्टर १९ मधून अटक केली होती. तर मार्च महिन्यात देखील महसूल गुप्तचर संचालनालय विभागाने (डीआरआय) दक्षिण दिल्लीतील सरोजिनी नगरमधून २८.८७ किलो हिरोईन जप्त केले होते. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात  डीआरआय विभागाने ५२ किलो हेरॉईन जप्त केले होते. ज्याची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत ८० कोटी किंमत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)