नवी दिल्ली – दिल्लीच्या जातीपुर भागात आंबेडकरनगर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राम अवतार यांची मंगळावरी रात्री काही अज्ञात इसमांनी हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. ते आपल्या घराजवळील एका दुकानात काही खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ते पोलिस ठाण्यात आपली ड्युटी पुर्ण करून घरी आले होते व नंतर ते काही घरगुती खरेदीसाठी बाहेर पडले होते.

या हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही तसेच त्यांच्या मारेकऱ्यांचे वर्णनही समजू शकलेले नाही. सर्व शक्‍यता गृहीत धरून पोलिस या हत्येचा तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)