दिल्लीत हजारो रेल्वे अप्रेंटिसचे अर्धनग्न प्रदर्शन


नवी दिल्ली :
 रेल्वे अप्रेटिंसधारकरांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक दिली आहे. रेल्वेने नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातले नियम बदलल्याने अन्याय होत असल्याचा आरोप 2 हजार तरूणांनी अर्ध नग्न प्रदर्शन करुन सरकारचा निषेध केला.त्यांच्या या प्रदर्शनामुळे सरकारविरोधातील रोष पुन्हा एकदा समोर आले आहेत.

10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान देशाच्या विविध भागातले रेल्वे अप्रेंटिस धरणे आंदोलन करणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन देऊनही काही उपयोग झाला नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय एकीकडे स्किल इंडियाची भाषा पंतप्रधान करतात, पण मग आमच्यासारखे ऑलरेडी स्किल अवगत असलेले युवक रेल्वे का नाकारते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पूर्वी रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतले जायचे, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेला आहे, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)