केजारीवालांनी रिपोर्ट मागवला
नवी दिल्ली – फी न भरल्याने केजीतील 16 मुलींना सहा तास तळघरात कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना दिलीत घडली आहे. राबिया प्रायमरी स्कूलम्ध्ये हा क्रूर प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी सकाळी सात वाजता शाळेत पाठवलेल्या आपापल्या मुलींना दुपारी साडेबारा वाजता पालक न्यायला आले. मुली बाहेर न आल्याने त्यांनी मुलींची चौकशी चौकशी केली. फी न भरल्याने तुमच्या मुलींना सकाळपासून तळघरात कोंडून ठेवलेले आहे, अशी माहिती त्यांना शाळेच्या एका कर्मचाऱ्याने दिली. हे समजताच संतप्त पालकांनी शाळेत घुसून तळघरातील मुलींना बाहेर काढले.

16 मुलींना तळघरात बंद करून तळघराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. सहा तास तळघरात बंद राहिल्याने मुली अतिशय घाबरल्या होत्या.

पालकांनी हौज काजी पोलीस स्टेशनला राबिया शाळेच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या प्रकाराची माहिती कळताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)