दिल्लीत वीजेवर चालणाऱ्या एक हजार बसेस तैनात करणार

नवी दिल्ली – राजधानीतील वायुप्रदुषणावर उपाययोजना म्हणून दिल्ली परिवहनसाठी एक हजार इलेक्‍ट्रीक बसेस तैनात केल्या जाणार आहेत. त्यासाठी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला आज झालेल्या दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

केजरीवाल सरकारचा हा एक मोठा निर्णय आहे. दिल्ली प्रदुषण मुक्त करण्याच्या दिशेने आम्ही एक महत्वाचे पाऊल टाकले आहे असे केजरीवाल यांनी आपल्या ट्‌विटर संदेशात म्हटले आहे.

या बसेस खरेदी करण्याच्या प्रकियेवरही मंत्रिमंडळात चर्चा झाली. हा निर्णय सरकारच्या परिवहन विभागाकडे सोपवण्यात आला आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)