दिल्लीत लॉंड्रीला लागलेल्या आगीत चार जणांचा बळी

नवी दिल्ली – मध्य दिल्लीत एका फॅक्‍टरीला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. करोल बागेतील बिदोनपुरा भागात हा प्रकार घडला. ज्या फॅक्‍टरीत हा प्रकार घडला तिथे कपडे धुण्याची यांत्रिक लॉंड्री होती. त्याकामासाठी लागणारे द्रव नजरचुकीने जमीनवर पडले त्यातून ही आग लागली. ती भडकत असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील कामगारांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण एक जाडजुड इसम दरवाज्यातच अडकून पडल्याने बाकीच्या लोकांना तेथून बाहेर पडणे अवघड झाले आणि त्यांचा त्यात बळी गेला. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला.

ठार झालेले सर्व जण त्या लॉंड्रीतील कामगार होंते. सर्व मृतांची ओळख पटली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही तासातच ही आग आटोक्‍यात आणली. घटनास्थळी दोन बंब पाठवण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या
प्रकरणात अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)