दिल्लीत रस्त्याच्या क्षमतेच्या तुलनेत वाहने किती? 

हरित लवादाने सरकारकडे मागितले उत्तर 

नवी दिल्ली: दिल्लीत वारंवार होणारे ट्रॅफिक जाम आणि रोज खालावत जाणारी हवा प्रदुषणाची स्थिती या साऱ्या समस्येने ग्रासलेल्या दिल्लीकरांनी आता राष्ट्रीय हरित लवादाचा या प्रकरणात दरवाजा ठोठावला आहे. त्यानुसार राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीतील रस्त्यांची क्षमता किती आणि शहरात येजा करणारी नेमकी वाहने किती याचे उत्तर परिवहन मंत्रालयाकडे मागितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बेकायदेशीर पार्किंग आणि रस्त्यावरील अतिक्रमणे ही सुद्धा एक मोठी समस्या असून तो केवळ दिल्ली शहराचा नाही तर संपुर्ण देशातील साऱ्याच मोठ्या शहरांचा प्रश्‍न आहे. महानगरांमधील रस्त्यांच्या क्षमतेनुसार तेथे वाहनांना परवानगी देण्याची गरज असून त्या विषयी परिवहन मंत्रालयाने सर्व संबंधीत राज्यांच्या सरकारांशी चर्चा करून धोरण ठरवले पाहिजे आणि या विषयावर कालबद्ध पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. हरित लवादाने एका याचिकेच्या अनुषंगाने परिवहन मंत्रालयाला ही सुचना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)