दिल्लीत मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने रात्री उशिरा भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास नकार देत याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास दिल्लीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.

कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. १०४ जागा घेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पण बहुमतासाठी आवश्यक असणारे ११२ हे संख्याबळ गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (७८) आणि जेडीएस (३७) यांनी आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. परंतु राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापण्याचे निमंत्रण दिल्याने काँग्रेस आणि जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यानंतर युवक काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मोदींचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)