दिल्लीत मानवी तस्करीचा प्रकार उघड…

39 नेपाळी मुलींची सुटका 

नवी दिल्ली – दिल्ली महिला आयोग आणि पोलिसांच्या संयुक्‍त पथकाने केलेल्या कारवाईमध्ये मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघड झाले आहे. दिल्लीतील पहाडगंज भागातील एका हॉटेलमधून 39 नेपाळी मुलींची सुटका करण्यात आली आहे. रात्री 1 च्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली आणि पहाटे 6 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती, असे दिल्ली महिला आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवरून या कारवाईची माहिती दिली.

दिल्लीतील पहाडगंज भागातील हॉटेल हृदय इन या हॉटेलमधून नेपाळी मुलींची तस्करी होत असल्याबाबतची माहिती दिल्ली महिला आयोगाला मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. या छाप्याच्यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या नेपाळी मुलींना आखाती देशांमध्ये पाठवण्यात येणार होते. इतक्‍या मोठ्या संख्येने मानवी तस्करीविरोधात 25 जुलैपासून झालेली ही तिसरी मोठी कारवाई आहे.

यापूर्वी 25 जुलै रोजी अशीच कारवाई झाली होती. तेंव्हा दिल्ली महिला आयोगाने मुनिर्का भागातून 16 महिलांची सुटका केली होती. त्या सर्वांना नेपाळवरून आणण्यात आले होते. तर 30 जुलै रोजी दिल्ली आणि वाराणसी पोलिसांनी वसंत विहार भागात केलेल्या संयुक्‍त कारवाईमध्ये 18 महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यामध्ये नेपाळच्या 16 जणींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)