दिल्लीत मध्यान्ह भोजनातून 25 विद्यार्थ्यांना विषबाधा

नवी दिल्ली – दिल्लीतील नरेला परिसरातील सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनातून 25 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. या सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नरेला येथील सरकारी शाळेत नेहमीप्रमाणे आज शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आले. त्यानंतर सुमारे 25 विद्यार्थ्यांना मळमळ होउन उलटया होउ लागल्याचे लक्षात येताच सर्वांना सत्यवादल राजा हरीशचंद्र हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या सर्व विद्यार्थ्याची प्रकृती आता स्थिर असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान, आठवडयाभरात दुस-यांदा असा प्रकार घडला आहे. पूर्व दिल्लीच्या खिचडीपूरमधील दिल्ली शाळेत शनिवारी मध्यान्ह भोजन केल्यानंतर दोन मुलींना विषबाधा झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)