दिल्लीत फॅशन डिजायनर महिलेची हत्या 

नवी दिल्ली – फॅशन डिजायनर असलेल्या एका महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. दिल्लीतल्या उच्चभ्रू वसंत कुंज वसाहतीत या महिलेच्या घरीच ही हत्या झाली. या महिलेबरोबर तिच्या नोकराचीही हत्या झाली आहे. तिच्या टेलरने दोन सहकाऱ्यांच्या मदतीने दीर्घकाळापासून थकित असलेल्या पैशाच्या वादातून ही हत्या झाली असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

माया लखानी असे हत्या झालेल्या 53 वर्षीय फॅशन डिजायनर महिलेचे नाव आहे. त्या तुलसी क्रिएशन्स नावाचे बुटिक ग्रीन पार्क परिसरामध्ये चालवत असत. त्यांचा नेपाळी घरगडी बहादुर याचीही हत्या झाली आहे. तीक्ष्ण हत्याचाराने अनेक वार झालेले या दोघांचे मृतदेह बंगल्यात आढळून आले होते. आरोपींनी घरातील ज्वेलरीही लुटून नेली आणि घराची तोडफोडही केली होती. ही घटना रात्री 10 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे.

लखानी यांच्यासाठी टेलरिंग करणारा राहुल अन्वर, त्याचा चुलत भाऊ रहमत आणि मित्र वसिम यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पहाटे 2.45 वाजता हे तिघेही वसंत कुंज पोलिस ठाण्यामध्ये गेले आणि त्यांनी आपण दोघांची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिस वसंत कुंजमध्ये गेले असता तेथे लखानी आणि बहादुर यांचे मृतदेह रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)