दिल्लीत पोलीस हेड कॉन्स्टेबलला लष्करी जवानांची मारहाण

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि लष्कराचे जवान यांच्यात हाणामारी होऊन जवानांनी पोलीस हेड कॉन्स्टेबलला लाठ्‌याकाठ्‌यांनी मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे. या हाणामारीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप हे दिल्ली कॅंटोनमेंट भागातील पिरू विहार ठाण्यावर काही गोष्टींची पडताळणी करण्यासाठी गेले होते. तेथे एका लष्करी जवानाने त्यांना रोखले. आयडेंटिटी कार्ड दाखवण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. नंतर हा वाद इतका विकोपाला गेला, की दोघांमध्ये हाणामारी झुरू झाली. व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप यांना लष्करी जवान लाठ्‌या आणि रायफल्सनी मारहाण करताना दिसत आहेत.

हेड कॉस्न्टेबल संदीप यांनी या घटनेची संपूर्ण माहिती ठाण्यावर नोंदवली. त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर प्रकरण अधिक चिघळले. हेड कॉन्स्टेबल संदीप यांना हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचे सांगण्यात आले असून घटनेचा अधिक तपास चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)