दिल्लीत घुमणार पुन्हा “भारत छोडो’चा नारा

राजपथावर धावणार क्विट इंडिया मूव्हमेंट’ चित्ररथ

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्यांसाठी 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी “भारत छोडो’चा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात आंदोलन उभारले होते. हा नारा आता दिल्लीच्या राजपथावर पुन्हा एकदा घुमणार आहे. गांधींजीनी उभारलेल्या या चळवळीचा नुकताच 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या पाश्वभूमिवर पुढील महिन्यात होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी राजधानीत यंदा “क्विट इंडिया मुव्हमेंट’चा चित्ररथ धावणार आहे.

-Ads-

प्रजासत्ताक दिनाला राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये अनेक राज्यांचे चित्ररथ सामील होतात. या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचे विशेष महत्त्व आहे. मागील वर्षी शिवराज्याभिषेकाच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर यंदाही विशेष चित्ररथासाठी तयारी सुरू झाली आहे. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथावर “भारत छोडो अभियाना’चा देखावा साकारणार असून यासाठी समितीही नेमण्यात आली आहे.

यंदा राजपथावर महाराष्ट्राकडून प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात “क्विट इंडिया मुव्हमेंट’वर चित्ररथ तयार करण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी संकल्पचित्र आणि चित्ररथ बांधणी/उभारणीकरता विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीला चित्ररथासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यासाठी संबंधित विभागांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)