सर्वोच्च न्यायालयाने नायब राज्यपालांना दिले समिती स्थापण्याचे आदेश
नवी दिल्ली – दिल्लीत घन कचरा व्यवस्थापनाची स्थिती अत्यंत गंभीर बनली असून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी लक्ष घालण्याचा आदेश नायब राज्यपालांना दिला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरीकांच्या प्रतिनिधींची एक समिती नेमून हा विषय त्वरीत मार्गी लावण्यात यावा अशी सुचनाहीं न्यायालयाने केली आहे.

राजधानी दिल्लीत स्वच्छ भारत अंतर्गत अनेकवेळा स्वच्छता मोहीमा राबवण्यात आल्या. पण गोळा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्‍न आहे. त्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज असते परंतु राजधानी दिल्लीतही तशा स्वरूपाचे प्रकल्पच उभे राहिलेले नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्‍न तेथे ऐरणीवर आला आहे.

दिल्लीत कचऱ्याचे अक्षरश पर्वत उभे राहिले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहेत. दिल्लीत अनेक साथीचे आजार बळावले असून या साऱ्या स्थितीचा विषय आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सन 2015 साली एका सातवर्षीय बालकाचा डेंग्युने मृत्यू झाला होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)