दिल्लीत आमदारांना मिळणार प्रत्येकी दहा कोटींचा निधी

नवी दिल्ली – आमदारांना आपल्या मतदार संघात विकास करण्यासाठी जो निधी दिला जातो त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने घेतला असून हा निधी 4 कोटी रूपयांवरून आता थेट 10 कोटी रूपये इतका करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती आज विधानसभेत दिली. ते म्हणाले की आमदारांना स्थानिक विकासासाठीचा निधी कमी पडत असल्याने तो वाढवून मिळावा अशी मागणी आमदारांकडून सातत्याने केली जात होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-

यंदाच्या वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. भारतीय भाषांच्या अनेक अकादमी दिल्लीत कार्यरत आहेत त्याच धर्तीवर विदेशी भाषांसाठीही स्वतंत्र अकादमी दिल्लीत स्थापन करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)